निवडणुकीत आश्वासन देणं आणि त्या जोरावर निवडणुका जिकनं हे काही नवीन नाही. वर्षानुवर्ष दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळवेढा तालुक्यातील जनतेला फक्त कागदी घोडे नाचवत पाणी प्रश्नावरती राजकारण होत होतं. मागील दोन निवडणुका या मंजुरीचे टोकन दाखवून लढवत पाणी प्रश्नाचे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न झाला. मात्र हा प्रश्न केवळ राजकीय इच्छाशक्ती कमी असल्यामुळे प्रलंबित राहिला. २०२१ सालात झालेल्या पोटनिवडणुकीत कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी म्हणून आमदार समाधान दादा आवताडे यांचा विजय झाला. “दुष्काळात जन्माला आलो असलो तरी दुष्काळात मरणार नाही” असा शब्द पोटनिवडणुकीत आमदार समाधान दादांनी दिला होता. आपल्या माणसांची फसगत होऊ द्यायचे नाही या उद्देशाने पेटून उठलेल्या ध्येयवेढ्या समाधान दादांनी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी अहोरात्र झटण्याचा चंग बांधला.

मंगळवेढा तालुक्याच्या मस्तकावरील दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी आमदार समाधान दादा अवताडे यांनी अथक प्रयत्न करत २४ गावांची मंगळवेढा उपसा सिंचन योजना १३ मार्च २०२४ रोजी विना अट मंजूर करून घेतली. या कामासाठी त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष मार्गदर्शन आणि सहकार्य मिळालं. मात्र वर्षानुवर्ष फसगत झालेल्या जनतेचा याबाबत विश्वास संपादित करायचा असेल तर फक्त मंजुरीच्या फेऱ्यात योजना न अडकता तिची तत्काळ अंमलबजावणी सुरू झाली पाहिजे या ध्यासान आमदार समाधान आवताडे यांनी योजनेच्या पहिल्या टप्प्याचे व दुसऱ्या टप्प्याचे टेंडर प्रक्रिया सुरू व्हावी यासाठी मुंबई मंत्रालयाच्या चकरा मारत वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू ठेवला.

१३ मार्चला मंजुरी आल्यानंतर मंगळवेढ्यातील जनतेने आमदार समाधान दादा आवताडे यांचा १४ मार्चला भव्य सत्कार केला. आपल्या जनतेने केलेल्या सत्काराच्या हारातील फुले टवटवीत असतानाच १४ मार्चला शासन निर्णय देखील आला. हारातील फुले सुकण्याच्या आत १५ मार्चच्या सकाळी वर्तमान पत्रातून पहिल्या टप्प्याचे ७६ कोटी ०८ लाख ७५ हजार रुपयांचं टेंडर प्रसिद्ध देखील झाले. आणि जनतेला खात्री पटली कि आमदार समाधानदादा इतरांप्रमाणे भूलथापा देणारे नाहीत तर दिलेला शब्द पाळणारे नेते आहेत. दिल्या शब्दाला जागणारा आमदार पंढरपूर मंगळवेढ्याला मिळाला अशी जनभावना तयार झाली.

लोकसभा निवडणुक आचारसंहितेच्या काळानंतर पहिल्या टप्प्यातील कामाची निविदा प्रक्रिया देखील ऑगस्ट २०२४ मध्येच पूर्ण होऊन कामाचा मार्ग मोकळा झाला. वर्षानुवर्षे रखडत ठेवलेल्या योजनेचे काम पूर्णत्वास जात आहे असे दिसून आल्याने विरोधकांनी अपप्रचार करून जनतेची दिशाभूल करत श्रेयवादाचा खेळ सुरु केला. मात्र श्रेयवादाच्या चढाओढीत अडकतील ते समाधान दादा कसले? विरोधकांचे भूलथापा देण्याचे सत्र सुरु असतानाच आमदार समाधान आवताडे यांनी दुसऱ्या टप्प्याच्या निधी आणि टेंडर प्रक्रियेसाठी पाठपुरावा सुरु ठेवला. मुंबई मंत्रालय, अधिवेशन विविध विभागातील अधिकाऱ्यांशी भेटीगाठींसाठी धावपळ सुरु असून देखील दादांनी मतदारसंघातील जनसंपर्क तसूभरही कमी होऊ दिला नाही. दुसऱ्या टप्प्यातील टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्यानंतर ७ सप्टेंबर २०२४ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचं भूमिपूजन कार्यक्रम घेण्यात आला. १५ हजार पेक्षा जास्त जनसमुदायाच्या उपस्थितीत भव्य पेंडॉलमध्ये आंधळगावातील लक्ष्मीच्या टेकावर मंगळवेढा तालुक्याच्या मस्तकावरील दुष्काळाचा कलंक पुसला. सहा फूट व्यासाचे हारात गुंफलेले भव्य गोल लोखंडी पाईप, आंधळगाव – लक्ष्मीदहीवडी  रस्त्यावर उभारलेली कोनशिला उपस्थित जनसमुदायाला साक्ष देत होती कि समाधान आवताडे हा माणूस आपल्या भावनांचं राजकारण करत नाही तर आपल्या जगण्याचं दुःख जाणून त्यावर प्रेमाची फुंकर मारण्याचं काम करतोय.

समाधान दादा म्हणजे शब्दाला जागणारा नेता याची प्रचिती येते या छोट्या घटनेवरून ०७ सप्टेंबरला केवळ उपसा सिंचन योजनाच नाही तर तामदर्डी बंधारा, पंढरपूर येथील कासेगाव एमआयडीसी घोषणा अशा विविध कार्यक्रमाचं भूमिपूजन व कार्यारंभ सोहळा पार पडला. भव्य दिव्य कार्यक्रमामुळे आमदार समाधान आवताडे यांची निवडणूक सोप्पी झाली अशा चर्चा सुरु झाली. मात्र जाहीर कार्यक्रमातून दुसऱ्या टप्याच्या टेंडर प्रक्रियेबद्दल दिलेला शब्द पाळायचा यासाठी कार्यक्रम  संपल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी सोबत विमानाने तडक मुंबई गाठली आणि केवळ दोनच दिवसात ९ सप्टेंबर रोजी वर्तमानपत्रातून उपसा सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची ७८ कोटीं ४३ लाख ४० हजारची निविदा प्रसिद्ध झाली. एखाद्यानं मिळालेल्या संधीच सोनं करावं तर ते समाधान दादांप्रमाणे करावं असं संपूर्ण मतदारसंघात बोललं जाऊ लागलं ते केवळ त्यांच्या कार्यतत्परतेमुळेच.

दुष्काळाच्या झळांनी करपून निघालेल्या, डोळ्यात पिढ्यान पिढ्यांचा दुष्काळ हटल्याच्या सुखाने आलेलं पाणी अन भरून आलेल्या उरातून उपस्थितांनी आमदार समाधान दादांना प्रेमानं एक बिरुदावली दिली “पाणीदार आमदार”. आयुष्याचं सार्थक व्हावा असा क्षण, आयुष्यात येऊन काय मिळवलं असं जर कोणी दादांना विचारलं तर दादा निश्चितपणे सांगू शकतील कि “कित्येक पिढ्यांचा पाण्यासाठीचा संघर्ष संपवण्याचे, दुष्काळाचा कलंक पुसण्याचं भाग्य मला लाभलं”. मात्र दुसऱ्या बाजूला राजकारणात भांडवल करता येणारा मुद्दाच निकालात निघाल्यानं सुतकात गेलेले विरोधक अखंड मतदारसंघाने पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *